भूम (प्रतिनिधी)- परांडा येथील तहसील कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन दिनांक 24 मार्च रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरूवात तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी ग्राहक संघटना प्रतिनिधी व प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कांबळे,सहसंघटक विशाल शिंदे व सह सचिव आशिष बाबर, तालुका प्रतिनिधी विक्रम चौतमहाल,संतोष शिंदे तय्यब शेख यांनी उपस्थिती लावली होती.तालुक्याचे तहसिलदार निलेश काकडे यांनी प्रमुख पाहुणे यांचे स्वागत केले.
यावेळी जागृत ग्राहकांची हक्क व कर्तव्य तसेच शाश्वत जीवनशैलीत फक्त संक्रमण याविषयी अशिष बाबर,विशाल शिंदे प्रमोद कांबळे यांनी सविस्तर माहिती दिली. परांडा तालुक्याचे तहसीलदार निलेश काकडे यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र कामाचे कौतुक केले व उपस्थित ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या सर्व सदस्यांचा सन्मान केला. यावेळी पुरवठा निरीक्षण अधिकारी मिलींद पराळे, नितीन भांडवलकर. सहाय्यक महसूल अधिकारी,अनुजा मलगोंडे पुरवठा निरीक्षक,अशिष ठाकूर,उमेश पालके प्रतिनिधी एस.टी.महामंडळ, परंडा जि धाराशिव येथील तहसिल कार्यालयात जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून तहसीलदार काकडे यांनी यावेळी धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कांबळे, जिल्हा सहसंघटक विशाल शिंदे, जिल्हा सहसचिव आशिष बाबर, जिल्हा कार्यकारणी सदस्य संतोष शिंदे, परंडा ता. सचिव विक्रम चौतमहाल, ता.सदस्य तय्यब शेख तालुकयातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदार व नागरीक उपस्थित होते. कनिष्क भारत गॅस एजन्सी परांडा, विठू माऊली इंडियन गॅस एजन्सी आनाळा, भारतीय स्टेट बँक शाखा परांडा आदी कार्यालयालयातील प्रतिनिधी पत्र देऊनही गृहाक हक्क दिनास उपस्थित नसल्या कारणामुळे तहसिलदार परंडा संबंधीत कार्यालयास काढणार पत्र.