तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह परिसरातील मोक्याच्या स्थावर मालमत्ता महामार्ग रस्तालगत शेती वर परप्रांतीय धनधाडंग्या डोळा असुन ते दलालाचा माध्यमातून विविध मालमत्ता खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे.सिंग इज किंग्ज बनत असल्याचे सध्या व्यवहारा वरुन दिसुन येत आहे.
परप्रांतीय मालमत्ता शेती खरेदी करताना दलालांचा माध्यमातून संबंधित अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरुन कोट्यावधीची मालमत्ता लाखात खरेदी करीत आहेत. ड्रग्ज नंतर तुळजापूर करांवर हे भूमाफियाचे मोठे आक्रमक होत आहे. हे धनधांडग्या पैशाचा जोरावर प्रचंड मालमत्ता खरेदी करीत असुन जमीन घरे विकलेली बापाची पोरांना यांच्या जवळ नोकरीस राहण्याचे दिवस येण्याची शक्यता आहे.
परप्रांतीयांना तुळजापूर शहरात स्थावर मालमता, शेतजमीन खरेदी करताना अनेक नियम अटी असताना त्या शिथील कृरुन काहीत अनियमीतता माध्यमातून खरेदी केल्या जात आहे. परप्रांतीयाचा काळा पैसा पांढरा करण्याचे केंद्र तिर्थक्षेञ तुळजापूर बनत चालले आहे.
शहरातील आरक्षित भूखंडाचे श्रीखंड करुन ही मंडळी खात आहेत. परप्रातीयांनी शेकडो कोटी रुपये तुळजापूरात गुंतवल्याचे चर्चा आहे. स्थानिक उद्योजकांवर धाडी पडत आहेत माञ ही मंडळी आयकर, जीसीएसटी वाल्यांच्या नजरेतुन कसे काय सुटत आहेत या बाबतीत आश्चर्य व्यक्त होत आहे. बँकेचे ट्राँजेक्शन अर्थिक व्यवहार तपासले तर बरेच बाहेर येण्याची शक्यता आहे. तुळजापूर सह परिसरात मालमत्ता शेती खरेदी बाबतीत एक न्याय व परप्रातीयांनी खरेदी करताना दुसरा न्याय अशा पध्दतीने अधिकारी वर्ग आपल्या कार्यालयाचा कारभार पाहताना करीत असल्याची चर्चा होत आहे.
दस्त रद्द करण्याची मागणी
शासनाचा भुखंड व शासनाच्या या क्षेत्रावरील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथे अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन मागील काळात फेर देखील घेतलेले आहेत. याची चौकशी करून संबंधित तात्कालीन सबरजिस्टर व उपअधीक्षक भूमी अभिलेख, कार्यालय तुळजापूर या अधिकाऱ्यांवर योग्य ते कारवाई करून शहरातील शासनाचे भुखंड सर्व दस्त रद्द करण्यात यावे.