धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्रातील व राज्यातील माहिती सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या वतीने आज धाराशिव येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक तुळजापूर नाका येथे अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चामध्ये शेकडो शेतकरी आपापले ट्रॅक्टर घेऊन सामील झाले होते. छत्रपती शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप झाला. मोर्चात सामील शेतकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने कर्जमाफी सारखे अनेक आश्वासन दिली. परंतु प्रत्यक्षात सत्तेत आल्यावर विसर पडलेला दिसत आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार होते त्याचे काय झाले? मागेल त्याला सौर पंप अनेक शेतकऱ्यांनी नोंदी केल्या प्रतक्षात अजुन एकालाही मिळाला नाही. रोजगार हमी योजना ची कामे चालू कधी होणार. ती तातडीने चालू करावीत. तुळजापूर, तामलवाडी ड्रग्स प्रकरणात सखोल चौकशी करून पकडलेल्या आरोपीचे सी.डी.आर तपासून कारवाई करावी. आदी मागण्या मांडण्यात आला.
मोर्चामध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, उपाध्यक्ष सयाजीराव देशमुख, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, धाराशिव शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, परंडा तालुकाध्यक्ष हनुमंत वाघमोडे, भूम तालुकाध्यक्ष रुपेश कुमार शेंडगे, लोहारा तालुकाध्यक्ष राजू तोरकडे, सेवादल जिल्हाध्यक्ष विलास शाळू, महिला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई सपाटे, जिल्हा परिषद माजी गटनेते प्रकाश आष्टे, माजी सदस्य प्रकाश चव्हाण, माजी सरपंच अशोक भाऊ पाटील, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, उमेश राजेनिंबाळकर यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.