धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार पुरातत्त्व खात्याची आढावा बैठक घेण्यासाठी तुळजापूर दौऱ्यावर आले असता त्याप्रसंगी पुरातत्व अभ्यासक या नात्याने त्यांचा सत्कार करून, गतवर्षीप्रमाणे याही वर्षी शासनाच्या वतीने महासंस्कृती या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी केली. धाराशिव जिल्हा हा साहित्य, संगीत व सांस्कृतिक चळवळीचे केंद्र असून गतवर्षी झालेल्या महानाट्य व महासंस्कृती या सांस्कृतिक महोत्सवाला धाराशिवकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता आणि त्याच्या संयोजन समितीचा भाग म्हणून जिल्ह्यातील अनेक साहित्यिक, कलावंत, पर्यटन व संगीत क्षेत्रातील मान्यवर मंडळींना आपली कला सादर करण्याची संधी देता आली होती. हा महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात यावा अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री ना आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती युवराज नळे यांनी दिली आहे.