तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीतुळजाभवानी मंदीर कळस तसेच ठेवायचे की पाडुन काम करावयाचे या बाबतीत आँर्कालाँजिकल सर्व्ह आँफ इंडीयाचा तज्ञ संचालकांचा पाहणी अहवाल आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करुन कळसा बाबतीत निर्णय घेतला जाईल. असे प्रतिपादन मंञी अँड अशिष शेलार यांनी पञकारांशी संवाद साधताना सांगितले .

यावेळी बोलताना शेलार म्हणाले कि, स्थानिक मंदीर समिती, पुरातत्व विभाग,  पुरातत्व विभाग कंञाटदार समावेत बैठक घेऊन काम सुरु केले. नंतर माञ मंदीर गर्भगृहाचे सत्य स्वरुप बाहेर आले.  त्यामुळे आज येथे येवुन संबंधितांची बैठक घेऊन पुढचे काम कशा पध्दतीने करावयाचे यावर चर्चा केली.  कळशाशी भाविकांचा भावना निगडीत आहेत. तसेच छञपती संभाजीराजे व सर्वसामान्य भाविकांचे मते विचारात घेऊन कळसावर निर्णय घेवु असे यावेळी स्पष्ट केले. पुर्वीचे अहवाल  खाजगी मंडळी कडुन केल्या बाबतीत तसेच सँन्ड ब्लाँस्टींगमुळे मंदीर भिंतीचे नुकसान होत असल्याचा आरोप छञपती संभाजी राजे यांनी केल्या बाबतीत प्रश्न पञकारांनी विचारताच शेलार म्हणाले कि, पुरातत्व विभाग हे आंतर राष्ट्रीय मानांकना नुसार काम करते हे लक्षात घ्या. मंदीर त्यांचा माध्यमातून जिर्णोध्दार काम करीत आहे.त्यामुळे पुरातत्व विभाग, राज्य पुरातत्व विभागाचा माध्यमातून आलेला अहवाल स्विकारल्याचे यावेळी स्पष्ट केले. कामा बाबतीत राजेसह सर्वांना माहीती देवु असे यावेळी स्पष्ट केले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटिल पाटील उपस्थितीत होते.

 
Top