धाराशिव (प्रतिनिधी) - मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यांच्यासाठी धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्यावतीने मार्च रोजी उत्तर पार्टीचे आयोजन दि.28 मार्च रोजी करण्यात आले होते.
धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीस उप विभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश जाधव, रवींद्र अंभोरे, पोलीस उप निरीक्षक संदीप ओव्हाळ, अक्षय दिघोळे यांच्यासह विश्वास शिंदे,खलिफा कुरेशी,धनंजय शिंगाडे,मसूद शेख, वाजीद पठाण,खादर खान पठाण,नंदकुमार गवारे,सलीम शेख, बाबा मुजावर,गणेश वाघमारे,जावेद शेख,अलीम शेख,पोलीस अंमलदार चक्रधर पाटील, विरपक्ष वाघमारे, पोहेकॉ सुधीर मुंगळे, एस आर जाधवर, प्रवीण जमादार, मोबीन शेख, रिजवान बेग, गजानन कराळे, बापू पुरके आदींसह शहरातील मुस्लिम बांधवांसह,प्रतिष्ठित नागरिक पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.