तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेचा एका भक्ताने देवी गाभाऱ्यातील सिंहासन पेटी क्रमांक दोन मध्ये गुरुवार दि. 27 मार्च रोजी सोन्याचे 11 बिस्किटे दानपेटीत अर्पण केले. सिंहासन पेटी क्रमांक दोन ही श्रीतुळजाभवानी मंदिरातील चोपदार दरवाजा जवळ आहे. ही दानपेटी शुक्रवार दि. 28 मार्च रोजी उघडली असता त्यात अकरा सोन्याचे बिस्किटे आढळुन आले.