तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील मलबा हाँस्पीटल समोरील आरक्षित जागेवर याञा मैदान जागेवर शासन नाव लावुन वाहनतळ करण्याच्या मागणीची शासन दखल घेतली जात नसल्याचा निषेधार्थ शहरातील महिला व पुजारी बांधवांनी अण्णा हजारे टोपी घालुन मंदीर महाव्दार समोर महाआरती करुन तुळजापूर-धाराशिव महामार्ग रस्त्यावर मलबा हाँस्पीटल चौकात रस्ता मंगळवार दि. 25 मार्च रोजी रोको आंदोलन केले.
या आंदोलनामुळे महामार्ग रस्त्यावर असणारी वाहतुक ठप्प झाली होती. यावेळी या प्रश्नी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलंकानी दिला.यावेळी आंदोलन स्थळी तहसिलदार अरविद बोळंगे यांनी निवेदन स्विकारले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब डोंगरे, शिवसेना नेते अमोल जाधव, नगरसेवक रणजित इंगळे, महेश चोपदार, भारत लोंढे, कदम अदिसह शेकडो महिला, पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते.