तेर (प्रतिनिधी)- संत गोरोबा काकांच्या मंदिर  महाद्वार कमानीच्या बांधकामांची जागा न बदल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 एप्रिल पासुन आमरण उपोषणाचा बसण्याचा इशारा तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

संत गोरोबा काका मंदिरांच्या महाद्वाराची जागा बदलली जावी म्हणून सर्व संबंधितांना कळविण्यात येऊन सुध्दा प्रस्तावीत जागा बदलण्यात आली नाही. 

भाविकांच्या भावना लक्षात घेऊन महाद्वाराचे कमानीचे काम वास्तूशास्त्राप्रमाणे पुर्व दिशेला करण्यात यावे. जागा न बदलल्यास भाविक, ग्रामस्थ , वारकरी सांप्रदायाचे प्रमुख यांना सोबत घेऊन 2 एप्रिल रोजी लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर  व नागरीकांनी  जिल्हाधिकारी  यांना निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर तेर येथील ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

 
Top