तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील मौजे तामलवाडी येथे अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढला असुन मटका, जुगार तर चक्क तामलवाडी पोलीस स्टेशन पासून काहीच फुटाच्या अंतरावर (हाकेच्याअंतरा इतका) चालत असल्यामुळे त्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणीचे निवेदन पोलिस आयुक्त व जिपोप्र धाराशिव यांच्याकडे निवेदन देवुन केली आहे.
मौजे तामलवाडी हे गाव धाराशिव व सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर येत असून तसेच मराठवाड्याचे प्रवेशद्वार व येथे औद्योगिक वसाहत असल्यामुळे उद्योग व्यवसायास व कामगाराकरिता विशेष महत्त्व आले आहे. याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन मौजे तामलवाडी येथील पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावरच मटका, जुगाराचा बाजार अत्यंत मोठा धंदा चालू असून, सध्याच ड्रगधंद्याचे तुळजापूरचे प्रकरण याच तामलवाडी गावामधून उघडकीस आले आहे. जो विषय विधानभवन अधिवेशनात व लोकसभेत ही या विषयाची लक्षवेधी मांडण्यात आलेली होती. या मटका जुगारमुळे मौजे तामलवाडी येथे गोरगरिबाची लूट होऊन त्यांची घरे उध्वस्त होत असून यामध्ये स्थानिक एका राजकारणाचा हात आहे. तरी तपासाअंती अशा मंडळी विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा पोलीस स्टेशन तामलवाडी समोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल. असे निवेदन म्हटले आहे.