भूम (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक तात्या कांबळे होते. प्रमुख अतिथी शंकरराव पाटील वरिष्ठ महाविद्यालय भूम येथील  प्रा. डॉ. नितीन पडवळ व प्रा. डॉ. राहुल राठोड होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

यानंतर प्राध्यापक राठोड यांनी रामन यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. राठोड हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असल्यामुळे त्यांनी रामन इफेक्ट याविषयी सविस्तर माहिती सांगितली. त्याचबरोबर प्रा. डॉ. पडवळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शालेय जीवनामध्ये मातृभाषा खूप महत्त्वाचे आहे. मातृभाषेमधून आपण विज्ञानातील मूलभूत संकल्पना समजून घेतल्या तर आपल्या शैक्षणिक जीवनाचा पाया मजबूत होतो. त्याचबरोबर या ज्ञानाच्या जोरावर आपण संशोधनामध्ये प्रगती करू शकतो. आज भूम परिसरातील अनेक विद्यार्थी संशोधन करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मूलभूत संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. 

मुख्याध्यापक तात्या कांबळे म्हणाले की, जोपर्यंत आपण आपला वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करत नाही. तोपर्यंत आपणास श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक समजणार नाही .आपली श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञानातील संकल्पना स्पष्ट करणारे प्रयोग सादर केले. या प्रयोगाचे निरीक्षण व परीक्षण प्राध्यापक डॉ. नितीन पडवळ व राहुल राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पायघन यु. पी. यांनी केले. तर सूत्रसंचालन दत्ता गुंजाळ यांनी केले. कार्यक्रमाला पवार काकासाहेब, पाटील दयानंद, पवार बापूसाहेब, जोशी अविनाश, विधाते वैशाली, पवार नितीन, शिंदे कैलास, साठे हरीश, माने  व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top