कळंब (प्रतिनिधी)- शहरातील विंनिंग किड्स इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन दि. 28 फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरे करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालरोग तज्ञ डॉ. रामकृष्ण लोंढे हे होते तर उदघाटक म्हणून प्रा. डॉ. आर. वी. घाडगे उपस्थित होते . तर प्रमुख पाहुणे सपोनि .पी. डी. फुंडगे, आर. बी. थोरात अंगणवाडी पर्यवेक्षिका हे पाहुणे उपस्थित होते. यावेळी मुलांनी विविध गाणे सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सूत्रसंचालन एन. बी. सोनवणे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनवणे मॅडम, काळे मॅडम, गोसावी मॅडम,नऱ्हेरे मॅडम व इतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.