सोलापूर (प्रतिनिधी)-मध्य रेल्वेकडून 01105/01106 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - हजुर साहिब नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक होळी विशेष रेल्वेगाडी वाया कल्याण, पुणे, कुर्डूवाडी, बार्शी, लातूर, परळी, परभणी चालविण्याची घोषणा.
01105 ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून बुधवार दिनांक 12 मार्च व 19 मार्च 2025 रोजी पहाटे 12.55 वाजता निघेल. पुणे पहाटे 04.05 वाजता, कुर्डूवाडी सकाळी 07.35 वाजता, बार्शी सकाळी 08.25 वाजता, लातूर दुपारी 01.20 वाजता नांदेड स्थानकावर त्याच दिवशी संध्याकाळी 9 वाजता पोहोचेल.
01106 ही गाडी नांदेडहुन बुधवार दिनांक 12 मार्च व 19 मार्च 2025 रोजी रात्री 10.30 वाजता निघेल. लातूर गुरुवारी पहाटे 5.30 वाजता, बार्शी सकाळी 07.35 वाजता, कुर्डूवाडी सकाळी 08.35 वाजता, पुणे सकाळी 11.40 वाजता, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे गुरुवारी संध्याकाळी 04.05 वाजता पोहोचेल.डबे संरचना - एक पेंट्री कार, एक फर्स्ट एसी, एक सेकंड एसी, पाच थर्ड एसी, आठ स्लीपर, चार जनरल, एक व्दितीय श्रेणी कम दिव्यांग एसएलआर व एक पॉवर कार असे एकूण 22 एलएचबी डबे असतील.