धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील संत ज्ञानेश्वर मंदिर जवळच्या सर्वात जुन्या असलेल्या शेरखाने सुपर सर्विसेस पेट्रोल पंपाचे मालक अरुण कडप्पा शेरखाने (वय - 68 वर्षे) यांचे दि.11 मार्च रोजी पहाटे दुःखद निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर कपिलधारा स्मशानभूमीत मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, 7 भाऊ, चार बहिणी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यविधीस सर्व पक्षीय राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ शेरखाने व शिवसेना नेते नितीन शेरखाने यांचे मोठे बंधू होते.


 
Top