कळंब (प्रतिनिधी) -येथील नगर परिषद यांच्या वतीने विशेष वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. कळंब नगर परिषद हद्यीतील सर्व थकीत मालमत्ता धारकांना दवंडी व नोटीसद्वारे नगर परिषदेची थकबाकी भरणा करणे बाबत नोटीस देण्यात आलेली आहे पण नागरिकांनी मात्र याकडे पाठ फिरवल्याचे जाणवत आहे त्याचबरोबर वसुली कर्मचारी वारंवार भेट घेऊन थकबाकीचा भरणा करणे बाबत सुचना देत आहेत.
शासकीय व निमशासकीय कार्यालयाची देखील वसुली संदर्भात मोहीम राबवीण्यात आलेली आहे. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयास थकबाकीचा भरणा करणे बावत लेखी स्वरुपात पत्र देण्यात आलेले आहेत. या आर्थीक वर्षाची थकबाकी 1,31,38,000/- रक्कम रुपये व चालु येणे बाकी 2,75,96,000/- अशी एकुण येणे बाकी 4,07,34,000/- रक्कम रुपये येणे आहे.
नगर परिषदेचे ईमारत भाडे/ म्युन्सीपल जागा भाडे यांना देखील नगर परिषद कार्यालयाने वारंवार तोंडी व लेखी पत्र देऊन थकबाकीचा भरणा करणे बाबत कळविण्यत आलेले आहे. जे गाळेधारक म्युन्सीपल जागा भाडेकरु थकबाकीचा भरणा करणार नाहीत असे गाळे अथवा म्युन्सीपल जागा सील करण्यात येईल. जप्ती देखील थकबाकीच्या रक्कमेऐवढी करण्यात येईल.असा इशारा सुद्धा नगर परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे .
नगर परिषद मालमत्ता धारक यांच्याकडील थकबाकी भरणा न केल्यास नळ कनेक्शन बंद करण्यात येईल. तरी सर्व मालमत्ता धारक यांनी मार्च 2025 अखेर आपणाकडील थकबाकी रक्कमेचा भरणा करावा असे आवाहन नगर परिषदच्या मुख्याधिकारी मनीषा गुरमे तसेच कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मीकांत वाघमारे व करनिरक्षक अनिल हजारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.