कळंब (प्रतिनिधी)-कळंब तालुक्यातील खामसवाडी - मंगरूळ पिंपळगाव हा रस्ता अत्यंत खराब झाला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या रस्त्यावरील बांधकाम गेल्या काही दिवसांपासून सुरू केले आहे. त्यामुळे रस्त्यावर दगडांचे ढिग टाकले होते सदरील ढीगारे  फोडून त्याची खडी केली तयार केली असुन न फुटणारे मोठ मोठे दगडही तसेच पडलेले आहेत. सदरील खडी रस्त्यावर अस्ताव्यस्त कशीही पडली असल्याने अनेक दुचाकी स्लिप होऊन पडत आहेत. तर मोठ्या वाहनांना सुद्धा या खडीमुळे अडथळा निर्माण होऊ लागला आहे.  सदरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून जागोजागी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे दुचाकी चालकासह चारचाकी वाहनधारकांना याचा नहाक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच  मंगरूळ गावाची गेल्या चार ते पाच महिन्यापासून या रस्त्याच्या कामामुळे एसटी महामंडळाने सेवा बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तर विद्यार्थ्यांना परिक्षा सेटर मंगरूळ असल्याने विद्यार्थ्यांना दुचाकीवरून पालकांना सोडायला जावे लागत आहे. तसेच महीला, वृद्ध व्यक्तींना परगावी जाण्यासाठी मंगरूळ पाटीपर्यंत ३किलोमिटर पायी चालत जावे लागत आहे. त्यामुळे सदरील रस्त्यावरील रहदारी करणारे नागरिक हे त्रस्त झाले असून वरिष्ठ अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून खड्डे बुजून घ्यावेत व रस्त्यावर पडलेली खडी व मोठ मोठे दगड तात्काळ बाजुला सारुन घ्यावेत. अशी मागणी मानव अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम उप विभाग कळंब यांना कळविले आहे. सदरील विषयास न्याय न मिळाल्यास कार्यालया समोर लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. सदर निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे, कळंब तालुका अध्यक्ष लक्ष्मण बनसोडे, शहराध्यक्ष तुकाराम ताटे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुरेश कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top