धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल सोनार समाज प्रतिष्ठान तर्फे धाराशिव येथील उद्योजक प्राची केमिकल्स प्रोप्रायटर किशोर धारूरकर यांना आदर्श समाज भूषण पुरस्कार जाहीर श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि. 28/3/25 रोजी अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई जिल्हा बीड  व सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव  येथील उद्योजक किशोर दत्तात्रेय  धारूरकर यांना आदर्श समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनातर्फे दि.26/1/25 रोजी जिल्हा उद्योग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांचे सर्व सोनार समाज बांधवांच्या वतीने व मित्रपरिवार च्या वतीने कौतुक होत आहे.

 
Top