धाराशिव  (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य, देविदास पाठक यांची धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिक्षणमहर्षी श्री. सुभाषदादा कोळगे सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात आज बुधवारी (दि 26) रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांच्या हस्ते शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य सतीश देशमुख, साई श्रद्धा एज्युकेशनचे संचालक प्राचार्य सोमनाथ लांडगे, पत्रकार सुभाष कदम- पाटील, व्यवस्थापक शाम गंगावणे, अनिरुद्ध जवळेकर, वैशाली जोशी आदींची उपस्थिती होती.

 
Top