उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील कराळी येथिल कपिलवस्तू बुद्ध विहार परिसरात शनिवारी डॉ.के.डी.शेंडगे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.या शिबिरात दोनशे रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले.
या धम्म परिषदेचें उद्घाटक म्हणून माजी मंत्री संजय बनसोंडे होते.प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार,आमदार प्रवीण स्वामीं,जिल्हा युवक अध्यक्ष दिग्विजय शिंदे,स्वागत अध्यक्ष म्हणून दिलीप भालेराव होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे,भन्ते पय्यांनंद,भन्ते सुमेध नागसेन,भन्ते धम्मसार,भन्ते सुमंगल,आदींनी धम्म देसना दिली.दि लॉर्ड बुद्धा रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रत्येक वर्षी धम्म परिषद घेऊन धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात येते यंदाच्या परिषदेत नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावी या हेतूने येथिल मेडिकल कॉलेजच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.या शिबिरात अनेक आजारावर तपासणी करून औषध देण्यात आले. कांही रुग्णांच्या ईसीजी करण्यात आल्या तर बऱ्याच रुग्णांना तपासणी करून औषधे देण्यात आली या कामी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे प्रमुख डॉ.आर.डी.शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सोमनाथ कवठे,डॉ मेघा पाटील,डॉ प्रणिती बनसोंडे ,आनंद चव्हाण,साधना सरपे,पूनम मते, शीलावती कांबळे
आदींनी आरोग्य शिबिरासाठी परिश्रम घेतले.