धाराशिव (प्रतिनिधी)- बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांचा वाढदिवस गुरुवारी (दि.13) विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. 

वाढदिवसानिमित्त सकाळी धाराशिवचे ग्रामदैवत धारासुर मर्दिनी देवीची महापूजा करण्यात आली. त्यानंतर हजरत ख्वाजा शमसोद्दिन गाजी यांच्या दर्ग्यात चादर अर्पण करण्यात आली. त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगे महाराज चौक येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी, रुग्णांना फळे वाटप, रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.सायंकाळी भव्य अभिष्टचिंतन सोहळयात विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिष्ठित मान्यवर आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. त्यानंतर प्रसिद्ध गायक विशाल चव्हाण व सागर बेंद्रे यांच्या संगीताची मैफल पार पडली. त्यास हजारो श्रोते उपस्थित होते.

 
Top