धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने पंचायत समिती क्रीडा मंडळ या ठिकाणी टेबल टेनिस चे राष्ट्रीय प्रशिक्षक जगदीश भिवंडकर यांनी टेबल टेनिस ची कार्यशाळा घेतली. याप्रसंगी राष्ट्रीय प्रशिक्षक श्री जगदीश भिवंडकर यांनी टेबल टेनिस खेळासंदर्भातील बारकावे व अद्ययावत नियमावलींची स्पष्टता उपस्थित सर्व खेळाडू समोर करत टेबल टेनिस हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा गतीमान खेळ असल्याचेही सांगितले. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी आणि इतर सर्व वयोगटातील नागरिकांच्या शारीरिक स्वस्थतेसाठी टेबल टेनिस हा खेळ किती महत्त्वपूर्ण आहे हे देखील त्यांनी विशद केले.

या प्रसंगी टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष प्रा डॉ प्रशांत भागवत, सेक्रेटरी शेख सर, सचीव शेख जावेद , कोच विल्सन दलभंजन, सिद्धेश्वर बेलुरे सर, आनंद सुरवसे, सक्षम जाधव, स्वदीप नवले यशवंत कापसे आर्यन शिंदे तुकाराम जाधव संतराम पौळ ,सुरेश शेळके, मोहन शेवाळे, महेश पाटील, अविनाश पाटील,योगेश लाटे, निलकंठ कोळगे, विहान शेवाळे, ठोंबरे सर, कृष्णा आहेर, शिराळ, उंबरे मॅडम , युवराज नळे यांच्यासह खेळाडूंची मोठ्या संख्येने पस्थित होती. या प्रसंगी राष्ट्रीय कोच जगदीश भिवंडकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.


 
Top