तुळजापुर (प्रतिनिधी) - तालुक्यातील मौजे इटकळ येथील सिमरन रफिक मुजावर या नऊ वर्षीय चिमुकलीने केला पहिलाच रोजा उपवास. मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना समजला जातो आणि अशा या पवित्र रमजान महिन्यास रविवार दि.2 मार्च रोजी प्रारंभ झाला. या महिन्यात तमाम मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने व धार्मिक परंपरा जपत हा एक महिन्याचा रोजा उपवास करतात. पहाटे सहेरी केल्या नंतर दिवसभर न खाता पाणी ही न पिता हा उपहास करून सायंकाळी नमाज अदा करून उपहास सोडतात. मौजे इटकळ येथील नऊ वर्षीय लहान चिमुकली सिमरन रफिक मुजावर हिने ही आई वडिलांना रोजा उपवास करणार असल्याचे सांगितले आई वडिलांनाही संमती दिली आणि सिमरन मुजावर हिने सकाळी सहेरी करून नमाज अदा केला सध्या उन्हाचा वाढता पारा दिवसभर बाहेर फिरणे मुश्किल वाटत असताना या नऊ वर्षीय सिमरन रफिक मुजावर या लहान चिमुकलीने पवित्र अशा रमजान महिन्यातील पहिलाच रोजा मोठ्या उत्साहाने आनंदाने केला  सिमरन ही माजी सैनिक रफिक मुजावर यांची कन्या आहे.


 
Top