धाराशिव (प्रतिनिधी)- अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हा शाखेने छापा मारला असता 51 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी धाराशिव शहरात पेट्रोलींग करीत असताना पथकास गुप्त बातमी मिळाली की, शम्स चौक धाराशिव येथे एका दोन मजली बांधकाम असलेल्या खालील गाळ्यामध्ये सलमान गुलाम शेख यांने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गुटखा, पान मसाला व सुंगधीत तंबाखू ठेवली असुन तो विक्री करीत आहे. अशी माहिती मिळाल्याने पथकाने दोन पंचासमक्ष नमुद ठिकाणी छापा मारला असता एक इसम मिळून आला त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सलमान गुलाम शेख, वय 25 वर्षे, रा. इंदापुर ता. वाशी जि. धाराशिव ह.मु. गल्ली नं 12 खाजानगर धाराशिव असे सागिंतले. पथकाने नमुद ठिकाणी पाहणी केली असता मिळून आलेला सितार गुंटख्याचे 50 पुडे, बादशाहा गुटख्याचे 4 पुड्या, आरसीबी 4 पुड्या, आरएमडी पान मसाला 1 पुडा, माणिकचंद गुटख्याच्या 50 पुड्या, एम गोल्ड सुगंधीत तंबाखुच्या 01 पुडा,जाफरानी जर्दा 55 पुडे, रोयल 717 52 पुडे, तंबाखुचे 52 पुडे, रत्ना छाप तंबाखुचे 181 डबे असा एकुण 51 हजार 185 रूपये किंमतीचा माल मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेला माल व आरोपी सलमान गुलाम शेख, वय 25 वर्षे, रा. इंदापुर ता. वाशी जि. धाराशिव ह.मु. गल्ली नं 12 खाजानगर धाराशिव यास ताब्यात घेवून आरोपी याचे विरुध्द पोलीस ठाणे धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहा पोलीस निरीक्षक अंभोरे करत आहे.
5 मोटरसायकल व डिझेलसह आरोपीला अटक
सुरज उर्फ बबल्या उर्फ डालग्या श्रीपती काळे, रा.मोहा ता. कळंब जि. धाराशिव हा वडजी कडे जाणारे रोडचे बाजूस फटाक्याचे कारखान्याजवळ थांबला होतो. त्यावेळी स्थानिक गुन्हा शाखेला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्याची अधिक विचारपूस केली असता त्यांच्याकडे 5 मोटार सायकलसह दोन डिझेल कॅन्ड सापडले. एकुण 1 लाख 61 हजार 510 रूपये किंमतीचे जप्त करुन पुढील कार्यवाही कामी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपीस आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, पोलिस अंमलदार विनायक दहीहंडे, पोलिस अंमलदार प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली आहे.