धाराशिव (प्रतिनिधी) - देवगिरी प्रांत संस्कार भारती समितीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त कला धरोहर या विभाग आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथील स्मारकास देवगिरी प्रांत मराठवाडा संस्कार भारती समिती आजोळची माणसं या सत्रात वारसा स्थळ भेट सहलीचे आयोजन करण्यात आले होते. 

प्रांतातील नांदेड,बीड, अंबाजोगाई ,लातूर, धाराशिव , तुळजापूर , नळदुर्ग, अणदूर समितीतून पदाधिकारी व  कलासाधक 60 ते 70 जण सहभागी होऊन या स्मारक वारसा स्थळी कविता वाचन , पोवाडा, गोंधळगीत , गवळण, भारूड,श्री संत तुकाराम बीज निमित्त अंभगाचे गायन कलासाधकांनी केले. प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . संपूर्ण स्मारक , मंदिराची माहिती अशोक राजगुरु यांनी माहिती सांगितली सर्वांनी ती मग्न होऊन श्रवण केली त्यांन तर आपआपले घरून आणलेली शिदोरीचे एकात्रित भोजनाचा अस्वाद घेतला त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजवाड्यातील ओसरीवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला प्रथम संस्कार भारतीचे ध्येयगीतांनी सुरुवात केली प्रास्तविक देवगिरी प्रांत कला धरोहर संयोजक दत्त प्रसाद गोस्वामी यांनी केले देवगिरी प्रांतध्यक्षा प्रा. स्नेहल पाठकांनी अहिल्यादेवी जीवनातील दुर्मिळ प्रसंग त्यांच्या व्याख्यानातून व्यक्त केल्या लातूरचे धनंजय देशपांडे यांनी वारसा भेट बद्दल मनोगत व्यक्त केले त्यानंतर संत तुकारामांचे देवगिरी प्रांत महामंत्री डॉ. जगदीश देशमुख व धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष अनिल ढगे यांनी अंभग गायन केले त्यांनंतर देवगिरी प्रांत माजी अध्यक्ष तथा संरक्षक भारत लोळगे यांनी बहारदार गवळण व भाऊड गायन केले तुळजापूरचा गोंधळ सादरीकरण देवगिरी प्रांती सह महामंत्री डॉ. सतिश महामुनी व प्रांत दृश्य कला संयोजक कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी सादर केल्याने आई राजा उदो उदोच्या  गजराने राजवाडा दुमदमनून गेला. कविता वाचन नळदुर्ग संस्कार भारती समिती अध्यक्षा डॉ.सौ. जयश्री घोडके , उपाध्यक्षा सौ. कविता पुदाले यांनी केले नांदेड च्या डॉ. सौ. वैशाली गोस्वामी व सौ.अंजली देशमुख या वारसा स्थळ भेटी साठी धाराशिव जिल्हा मंचीय कला संयोजक प्रवीण गोरे, बीड समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत  सौंदत्तीकर , अणदूर समिती अध्यक्ष कैलास बोंगरगे , गणेश चादरे , मधु चादरे, तुळजापूर सचिव सौ. एकता व्यास दृश्य कला संयोजिका सौ. गीता रसाळ , निलेश व्यास ,कु. खुशी चि. हर्ष व्यास, कोळेकर आदि प्रांतांतील पदाधिकारी कलासाधक उपस्थित होते संबंध वारसा स्थळ भेटीचे छायाचित्रण नांदेड समिती प्राचीन कला धरोहर प्रमोद देशपांडे, अणदूर समिती दृश्य कला संयोजक कल्याण करपे धारशिव जिल्हा छायाचित्र संयोजक पत्रकार अनिल अगलावे यांनी केले सुत्रसंचालन धाराशिव समिती माजी सचिव तथा संरक्षक प्रभाकर चोराखळीकर यांनी केले तर आभार देवगिरी प्रांत मंत्री प्रमोद वझे यांनी मानले महाराष्ट्र गीतानी कार्यक्रमाची सांगता झाली . सर्व सहभागी वारसा स्थळ भेट अविस्मरणीय अनुभव आला असा चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

 
Top