तुळजापूर (प्रतिनिध) - येथे मंगळवार रोजी भरणा-या आठवडा बाजात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढल्याने हे भाजीपाला खाऊ न दिल्यास हिंसक होत असल्याने अशा जनावरांचा बंदोबस्त करुन मोकाट सोडणा-या मालकांवर कारवाई करण्याची मागणी त्रस्त बाजारकरु मधुन केली जात आहे.

आठवडी बाजार येथे मोठ्या प्रमाणात  मोकाट  जनावरे फिरत असून हे शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या हिरव्या पालेभाज्या तिथे जावुन खाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना रोखल्यास ते थेट विक्रेते व व्यापारी यांच्या अंगावर जात आहेत. यामुळे बाजारात पळापळ होत आहे. यात  महिलांना, लहान मुले, वृद्ध किरकोळ  जखमी होत आहेत. तर अशा मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगर परिषदेने करावा अशी मागणी बाजारकरु करीत आहेत.


मोकाटजनावरांना मुळे भितीचे वातावरण !

मोकाट  जनावरे हे खाऊ न दिल्यास हिंसक होवुन सैरभर पळत आहेत. तर काही थेट शिंगाने डुसण्या मारण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांचा बंदोबस्त करणे गरजे बनले आहे. अशी प्रतिक्रिया अमीर शेख यांनी दिली.


 
Top