तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील ड्रग्ज रँकेट प्रकरणी पोलिसांनी गजानन उर्फ हांग्या प्रदीप हंगरकर या आरोपीला अटक केले असुन त्याला बुधवार दि. 26 मार्च रोजी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत 14 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. ड्रग्ज तस्करीत इतर 11 आरोपी फरार असुन, पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. पोलीस तपासात 25 आरोपी निष्पन्न झाले असुन तपास सुरु असल्याने आरोपींची संख्या वाढणार आहे. 

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्याने तुळजापुरातील अनेक जण नॉट रिचेबल झाले आहेत. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, युवा नेते विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी उप सभापती शरद जमदाडे यांच्यासह इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर या फरार आरोपींचा शोध सुरु आहे. ड्रग्ज तस्करीत 25 जन आरोपी असुन 11 जन फरार आहेत.10 जन जेलमध्ये आहेत. पोलिसांनी गोपनीय ठेवलेले 4 आरोपी कोर्टात जाहीर केले असुन 7 नंबरचा आरोपी इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, नळदुर्ग, 10 नंबर आरोपी म्हणुन चंद्रकांत उर्फ बापु कणे, 11 नंबर प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, 12 नंबर आरोपी म्हणुन उदय शेटे याचे नाव उघड केले आहे. या 4 गोपनीय नावासोबत नवीन 6 आरोपीत 20 नंबर आरोपी म्हणुन विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, 21 नंबरला गजानन उर्फ हांग्या प्रदीप हंगरकर, 22 ला शरद रामकृष्ण जमदडे, 23 ला आबासाहेब गणराज पवार, 24 ला अलोक शिंदे व 25 नंबर आरोपी म्हणुन अभिजीत गव्हाड याची नावे जाहीर केली आहेत. मुंबई येथील संतोष खोत व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग हे सर्व 11 आरोपी फरार असुन न पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

वाढत असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड मध्ये  काही राजकीय पक्षाशी व व्यक्तीशी संबंधित आरोपी असले तरी ते उघड झाल्याने यांचे संबधित मंडळी मिञ, परिवार चांगलाच हबकुन गेला आहे.  पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत.

 
Top