तुळजापूर (प्रतिनिधी)-  ड्रग्ज प्रकरणामुळे बीड, परळी नंतर तिर्थक्षेञ तुळजापूर राज्यात चर्चीत झाले आहे. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संसदेत ड्रग्ज तपास बाबतीत दाखवलेल्या गंभीर प्रश्नाचा पाढाच संसदेत वाचल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरण देशात पोहचल्याचे स्पष्ट झाले. हिंदू  धर्मियांचे पविञ तिर्थक्षेञ ड्रग्ज विळख्यात सापडल्याने हिंदूत्ववादी संघटना या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात ड्रग्ज प्रकरणी पोलिस उशीरा अँक्शन वर येताच शहरातील चोऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात ड्रग्ज प्रकरण बाहेर येण्यापुर्वी दररोज मोठ्या संखेने चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. तोंडाला रुमाल बांधलेले व राञी फिरत असलेले चोरांचे व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत होते. माञ चोरांचा तपास लागत नव्हता. शहरवासिय या चोरीच्या घटनेने रात्र-रात्र जागुन काढत होते. तर बाह्य भागात दिवसा घराला कड्या लावुन घरात बसत होते. सांयकाळी फिरायला जाणाऱ्या महिलांनी बाहेर पडणे बंद केले होते.

बाह्य भागानंतर चोरटे शहराचा वर्दळीचा भागात राञी साडेसात नंतर चोऱ्या करु लागले होते. चोरांना भितीच कुणाची राहिली नव्हती. माञ तामलवाडी येथे तुळजापूरकडे येणार ड्रग्ज पकडताच पोलिस सजग झाले. नंतर ड्रग्ज रँकेट मधील एक-एक मंडळी पकडले जावु लागले व पोनि मांजरे यांनी पोलिस निरक्षक पदाचा पदभार घेतला. नंतर माञ चोऱ्यांचे प्रमाण नव्वद टक्के घटले.

ड्रग्ज रँकेट पुर्वीच उध्दवस्त केले असते तर चोऱ्या झाल्या नसता. या ड्रग्जचे दुष्परिणाम पोलिस खात्यासह शहराचा शांतता, सुव्यवस्थतेवर होतो. याचा प्रत्यय आला आहे. बीड, परळी नंतर तुळजापूर नाव गुन्हेगारीत राज्यात चर्चित बनले होते. बीड, परळी आकाची यंञणा येथे कार्यान्वित असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. याची पोलिस अपेक्षित दखल घेतली नसल्याची चर्चा आहे. हे आका गब्बरगंड झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे तिर्थक्षेञ तुळजापूर अवैध धंदे मुक्त राहिले तरच तिर्थक्षेञ तुळजापुर शहरात शांतता सुव्यवस्थता कायम राहील अशा प्रतिक्रिया शहरवासियांमधुन व्यक्त होत आहेत.

 
Top