भूम (प्रतिनिधी)- ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी धाराशीव जिल्ह्याच्या संघाला शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी भूम येथील रवींद्र हायस्कूलचे मुख्याध्यापक लोकरे, उपमुख्याध्यापिका व खेळाडूंच्या आधारस्तंभ शर्मिला पाटील, कबड्डी कोच अमर सुपेकर आणि कबड्डीपटू सम्राट माने उपस्थित होते.
या संघामध्ये खालील खेळाडूंची निवड झाली आहे. सुरज शिंदे, निलेश व्हरे, स्वप्निल सुपेकर, स्वराज मुळे, जगदीश काळे, कुणाल भारती, हर्षद बाबर, संदीप मगर, सोहेल शेख, दिपक राठोड, रवि धुमाळ आणि ओंकार उंबरे. धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण मोहिते आणि कार्यवाहक महादेव साठे यांनी या संघाला शुभेच्छा दिल्या. तसेच, खेळाडूंना खेळासाठी आवश्यक किट ॲड. सिराज मोगल यांच्या वतीने प्रदान करण्यात आली. या मदतीबद्दल धाराशिव जिल्हा कबड्डी असोसिएशनने त्यांचे आभार मानले. रवींद्र हायस्कूलच्या वतीनेही संपूर्ण संघाला पुढील खेळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.