तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 ला आयडीबीआय शाखा तुळजापूरच्या वतीने सीएसआर इनिशीएटिव फंडातून दिलेल्या साहित्याची पाहणी शाखाधिकाऱ्यांनी भेट दिली.
यावेळी धाराशिव शाखेचे शाखाधिकारी सुनील पाटील, तुळजापूर शाखाधिकारी प्रदीप पाटील,ऋषिकेश कुतवळ,अमर लबडे उपस्थित होते. बँकेचेवतीने देण्यात आलेल्या साहित्याचे पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक गणेश रोचकरी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य महेंद्र पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी अजिंक्य गरडकर, प्रशांत पवार, अमन शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सहशिक्षक महेंद्र कावरे, सुज्ञानी गिराम, शिवा डाके उपस्थित होते.