तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील घाटशिळ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर राख सावड्याण्यासाठी तिसऱ्या दिवशी नातेवाईक गेले. तेथे अर्धी राख गायब होत असल्याचे प्रकार घडत असल्याने तिर्थक्षेञ तुळजापूरात खळबळ उडाली आहे. यापुर्वी सोनेचांदी दागिने रोख रकमेच्या चोऱ्या होत होत्या. आता चक्क अंत्यसंस्कार करण्यात आलेली राख चक्क चोरली जात असल्याने शहरवासियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरात दोन स्मशानभूमी असुन, यातील घाटशिळ स्मशान भूमीत मयत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जेव्हा नातेवाईक तिसऱ्या दिवशी राख सावडण्यासाठी गेले असता महिलेचा जळालेल्या मृतदेहाच्या पोट ते डोक्या पर्यतचा जळुन राख झालेला भागातील राख हाडके गायब झालेले दिसत असल्याने शिल्लक राहलेल्या राख व हाडकावर राख सावडण्याचा विधी केला जात आहे. यामुळे मयताचा नातेवाईकांमध्ये राख चोरी घटनेनेमुळे नाराजी व्यक्त होत आहे. हा प्रकार म्हणजे मढ्याचा टोळुवरील लोणी खाणे या म्हणी सारखा असल्याचे बोलले जात आहे. सदरील राख चोरी प्रकरणी चोरट्यांना पकडून राखचोरी मागचे सत्य शोधुन मृतदेहाची होणारी विटंबना थांबवावी अशी मागणी होत आहे.