तुळजापूर  (प्रतिनिधी)-  येथील सय्यद अलाउद्दीन हे तीस वर्ष भारतीय सैन्य दलामध्ये सेवा दिले असून एक फेब्रुवारी रोजी सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्या नंतर तुळजापूर येथे आले असता त्यांचे दहावी 1990 बॅच चे सर्व वर्गमित्रांनी शाषकिय विश्रामधाम  येथे त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिले. यावेळी सय्यद अलाउद्दीन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुढील जीवन हे समाजासाठी व मित्रांसाठी भरपूर वेळ देण्याचे आश्वासन दिले हे ऐकून सर्व मित्र भरावून गेले.  यावेळी वर्गमित्र शिवाजीराव मोरे, संतोष  साळुंखे, फिरोज पठाण, बाळासाहेब जाधव, बंडू बैरागी, दिगंबर हुंडेकरी, संजय केवडकर, दादासाहेब ननवरे, नानासाहेब पेंदे, धनंजय मोरे हे सर्व मान्यवर मित्र उपस्थित होते. 

 
Top