भूम (प्रतिनिधी)- जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे संचलित बार्शी येथील भगवंत अभियांत्रिकी महाविद्यालय (बीआयटी कॉलेज) मधील सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये तृतीय वर्षात शिकणाऱ्या 14 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युव्ह द्वारे कन्स्ट्रलॉजिक या कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयचे ट्रेनींग व प्लेसमेंट अधिष्ठाता प्रा. गजानन बुरगुटे सर यांनी दिली. महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कन्स्ट्रलॉजिक  या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता कंपनीच्या निवड समितीने विविध निकष व चाचण्यांच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड केली.

यामध्ये प्रांजल चेंडगे,आश्का आतार,तनुजा जाधव,स्वप्नील कडावकर,समरजित शिंदे, अनिकेत कदम,रणजित गरदाडे,दत्तात्रय गवारे,निखिल तौर,रिद्धी जाधव,शुभांगी सुरवसे, नंदिनी सुरवसे, आरती सातपुते, श्वेता मिंढे,या  14 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे  संकुल संचालक मा.श्री.ऋतुराज शिवाजीराव सावंत यांच्या सूचनेनुसार सध्याच्या स्पर्धात्मक युगात महाविद्यालयाचे विद्यार्थी यशस्वी व्हावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे व विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच नोकरीच्या संधी मिळाव्यात, यासाठी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्युव्ह ड्राईव्ह सातत्याने आयोजित केले जातात त्यासाठी विविध मार्गदर्शन शिबिरे ,कार्यशाळा, कौशल्य विकास कार्यक्रम, यांचे आयोजन केले जाते शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आतापर्यंत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांची निवड या प्रक्रियेतून विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झाली आहे. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा.गजानन बुरगुटे,यांच्यासह प्रा. गोपाळ ठोकळ  यांचे मार्गदर्शन लाभले. संकुल संचालक ऋतुराज शिवाजीराव सावंत, प्राचार्य रणजित शिराळ, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनीही कॅम्पस इंटरव्युव्ह मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 
Top