तुळजापूर (प्रतिनिधी)-श्रीतुळजाभवानी मातेच्या चैञी पोर्णिमे पार्श्वभूमी गुरुवार दि. 27 मार्च रोजी श्रीतुळजाभवानी मंदीरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर चैत्र यात्रा महोत्सव निमित्त जिल्हा आपत्ती व्यवस्थापन धाराशिव यांच्या वतीने  मुंबई येथील टीमला बोलावून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांमधील शिंग इंटेलिजंट सेक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे  प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी वैशाली तेलोरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन धाराशिव,  विमल नथवाणी मुंबई व त्यांची टीमने  प्रात्यक्षिक सह प्रशिक्षण दिले.


 
Top