भूम (प्रतिनिधी)- भूम येथील श्रेयस सुनीलकुमार डुंगरवाल यांनी केलेल्या डुडल ॲपच्या प्रतिमा संग्रहणासाठी सुधारीत प्रणाली या संशोधनास भारत सरकारचे पेटंट ला मान्यता मिळाली असून त्यांचे या यशबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रेयस डुंगरवाल, आदित्य देव,सुरज धमक, तेजस बोराडे यांनी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये शिकत असताना हे संशोधन केले व त्याच्या पेटंट साठी त्यांनी भारत सरकारकडे अर्ज केला होता. त्यांच्या या पेटंटला सरकारने मान्यता दिली असून त्यांचे हे संशोधन संगणकावर काम करणाऱ्यांसाठी फार महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी त्यांना प्राध्यापक प्रो. डॉ. स्वाती शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. श्रेयस डुंगरवाल हे ज्येष्ठ पत्रकार सुनील कुमार डुंगरवाल यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.