तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यात पवनचक्कीसाठी रोड तयार करणे, टाँवर फाँऊडेशनकनेक्टविटी रोड, बेलबाँटम रोड सह अनेक कामांसाठी मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन केले जात आहे. या गौण खनिजची परवानगी घेतली का याची चौकशी करुन अनाधिकृत गौण खनिज उत्खनन करणा-या माफीयांवर ज्या कंपनी कामासाठी हा मुरुम वापरला त्या कंपनीअधिकाऱ्यांवर कारवाई करुन गौण खनिज,उत्खननची जीपीएस सेटलाईट मँपींग सिस्टीमव्दारे मोजणी करुन संबधित भू माफीयावर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सुर्यवंशी यांनी केली आहे.
तुळजापूर तालुकासह खास करुन वडगाव लाख परिसरात पवनचक्की कंपनीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. त्यात रोड तयार करणे, लाईन जोडणे, टाँवर फाँऊडेशनसाठी स्थानिक ठेकेदारांना कामे दिले आहेत. यात भांडणे करा तुम्ही मलिदा खातो आम्ही या पध्दतीने पवनचक्की कंपनी काम करीत आहेत. या कार्यपध्दतीत दलालांचा आधार मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. राज्यात तुळजापूर तालुक्यात पवनचक्की प्रकरणात चर्चत असलेल्या वडगाव लाख येथे पवनचक्की कंपन्यांचे कामे सुरु आहेत. या पुर्वी पवनचक्की वाल्यांचा कारनाम्यामुळे या भागात अशांतता निर्माण झाली होती. पुन्हा आता तशीच अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे पवनचक्कीसाठी मुरुम मोठ्या प्रमाणावर लागतो. तो मुरुम कुठुन आणला जातो, गौण खनिज उत्खनन किती ब्राँस परवानगी घेतली. त्याची रॉयल्टी भरली आहे का? याबाबत ग्रामीण भागात अनेक चर्चा होत आहे. तुळजापूर लातूर तुळजापूर नळदुर्ग रस्त्यावर अंतर्गत गावातील मुरुम उत्खनन होत आहे. तसेच टाँवर लाईन टाकताना ही गेलेल्या जमिनीचा अत्यल्प मावेजा देवुन त्याची बोळवण केली जात आहे.
वडगाव (लाख) परिसरात पवनचक्कीच्या कामासाठी कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरुम गौण खनिज उत्खनन केल्याचे समजते. येथील गौण खनिज उत्खनन प्रकरणाची जीपीएस मँपिंग सिस्टीम ध्दारे तपासणी करावी. दोषी आढळल्यास खाणमालक आणि ज्या कंपनी कामासाठी मुरुम पुरवला त्या कंपनीवर गुन्हे दाखल करून वसुली करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी यांनी पत्रकारांशी बोलताना केली.