तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, महाराष्ट्र पणन महासंघ व नाफेड मार्फत हंगाम 2024 25 मधील आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत तुर खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणी दिनांक 24/1/2025 ते 22/2/ 2025 या कालावधीत सुरू करण्यात आलेली असून, त्यासाठी खालील कागदपत्रे तुळजापूर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संघ कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती आवार तुळजापूर येथे घेऊन येऊन नोंदणी करून घ्यावी. असे आवाहन संघाचे चेअरमन सुनील जाधव यांनी केले आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र सातबारा सन 2024-25 तुर नोंदणी असलेला 8अ., बँक पासबुक, आधार कार्ड, हमीभाव 7550 रुपये प्रतिक्विंटल. संपर्क महेश क्षीरसागर मोबाईल नंबर 9637252618, दयानंद क्षीरसागर 7972512969, सदाशिव क्षीरसागर 9307220159 यांच्याशी संपर्क साधावा.