भूम (प्रतिनिधी)-येथील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा. गंगाधर काळे यांना जीवन संघर्ष फाउंडेशन बेळगाव तर्फे इंडियन आयकॉन एज्युकेशन आवार्ड 2025 पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल विद्या विकास मंडळाचे सहसचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य. प्रा. संतोष शिंदे ,उपप्राचार्य इनामदार जी.एस. तथा वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिंदे डि. व्ही. एस बी तसेच त्यांच्या सत्कार करण्यात आला. प्रसंगी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य चंदनशिव एस. बी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ तानाजी बोराडे, डॉ. अनुराधा जगदाळे डॉ.गोकुळ सुरवसे ग्रंथपाल श्री. महामुनी हारी व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.