भूम (प्रतिनिधी)- रविंद्र हायस्कूल, भूमचा माजी विद्यार्थी खाडे ऋषिकेश दत्तात्रय याची मृदा व जलसंधारण विभागात वर्ग 2 पदी अभिनंदनीय निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा हायस्कूलच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना ऋषिकेश खाडे यांनी सांगितले की, यश मिळविताना पाया पक्का असावा लागतो. तो पाया माझा हायस्कूलमध्ये पक्का झाला होता. म्हणून मला हे यश मिळविता आले. असे बोलून त्याने हायस्कूलचे ऋण व्यक्त केले.
ऋषिकेश अभ्यासू, जिद्दी होता. त्याने हे यश खूप खडतर परिश्रमातून मिळविले. त्याबद्दल प्रशालेच्या वतीने त्याचा सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सत्कार समारंभाला संस्थेचे सचिव आर.डी.सूळ, मुख्याध्यापक भागवत लोकरे, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील, पर्यवेक्षक मिलिंद लगाडे, धनंजय पवार, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.