परंडा (प्रतिनिधी)-  भूम, परंड्याचे आमदार तानाजीराव सावंत यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर घणाघाती टिका केल्यानंतर भाजपाचे युवा नेते मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी परंडा येथे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मल्हार पाटील फिल्डींग लावत असल्याचे दिसत आहे. 

भाजपा नेते, धाराशिव जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा मल्हार पाटील यांनी सत्कार केला. तर याप्रसंगी मल्हार पाटील यांचाही सत्कार करून स्वागत करण्यात आले.  यावेळी भाजपा परंडा तालुका अध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सूर्यवंशी, भाजपा नेते सुखदेव टोंपे, डोमगावचे माजी सरपंच  मनोहर मिस्कीन, भाजपा युवा मोर्चा परंडा शहराध्यक्ष व नगरसेवक अविनाश विधाते, नगरसेवक . समरजीतसिंह ठाकूर, नगरसेवक अकिब पठाण, उत्तम शिंदे आदी उपस्थित होते.  मल्हार पाटील यांनी यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक आणि विविध विकास कामाबद्दल चर्चा केली.

 
Top