धाराशिव (प्रतिनिधी)- मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने धाराशिव शहरातील शम्सुल उलुम उर्दू स्कूल (गाजी स्कूल) येथील मराठी विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचा सत्कार पुष्प गुच्छ देऊन व मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी मुख्याध्यापक सय्यद, सय्यद जुनैद खलील, मराठी शिकविणाऱ्या शिक्षका यांचा पुष्पगुच्छ  देऊन सत्कार केला. यावेळी शिक्षक सेनेचे नेते बबनराव वाघमारे,शिक्षणप्रेमी वसंतराव गरड सर, विशाल बनसोडे, दादा धावारे उपस्थित होते.


 
Top