धाराशिव (प्रतिनिधी)- मैनेजर स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखा ढोकी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले की, नावी ऐप द्वारे रिचार्ज केलेल्या बैंकेच्या ग्राहकांचे खाते गोठविले आहेत. ते लवकरच फ्री करण्याची मागणी मनसेच्यावतीने मॅनेजर यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 25 डिसेंबर 2024 रोजी खिसमस सनानिमित्त मोबाईल कंपनी द्वारे पूर्ण वर्षाचा रिचार्ज 1 रुपये मध्ये आहे. अश्या गैरसमजेतून अनेक मोबाईल धारकांनी आपल्या आपल्या मोबाईलचे पूर्ण वर्षाचे रिचार्ज केले. जेव्हा त्यांनी रिचार्ज केले तेंव्हा फक्त 1 रुपये ट्रांजेक्शन होऊन पूर्ण वर्षाचा रिचार्ज ज्या त्या कंपनीच्या एक वर्षाच्या रक्कमेईतका रिचार्ज झाला. आमचे आपल्या बैंकेस एवढेच म्हणणे आहे कि, तुम्ही कोणत्या आधारावर ग्राहकांचे बॅक खाते गोठविले, होल्ड केले आहेत. तेही कोणतेही सूचना देता. जेव्हा एखाद्दया बॅकेच्या ग्राहकाचे ऑनलाईन फोर्डद्वारे पैसे चोरीला जातात किंवा ट्रान्सफर होतात आणि त्यावेळेस तुमची बैंक त्या ग्राहकाला साईबर क्राईमला ऑनलाईन तक्रार दया. आम्ही या मध्ये काही शकत नाही अशी उडवाउडवीचे उत्तरे देतात. मग आताच एवढी तत्परता का असा प्रश्न सर्व बैंक खातेदारामध्ये निर्माण झाला आहे. आपण या ग्राहकांचे खाते कोणत्या आधारावर होल्ड केले आहे. याचे स्पष्टीकरण तुम्ही या ग्राहकांना लेखी द्यावे अशी आमची आपणाकडे मागणी आहे. तरी वरील पूर्ण विषयाबद्दल आम्हाला माहिती देऊन सहकार्य करावे. अन्यथा आपल्या बॅकेच्या विरोधात मनसे स्टईल खळखट्याक पद्धतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद बँकेने व संबधित प्रशाससाने घ्यावी.
सदरील निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेंनेचे धाराशिव उपतालुका अध्यक्ष सलीमभाई औटी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. या वेळी अब्रार काझी, सुभान इनामदर, रणजित समुद्रे, पराग दिवाण, समीर हत्तीवाले, अर्शद काझी, विनोद बलाढे, बंडू कांबळे, आदर्श घोडके, शैलेश धाकपडे, अभय साठे, सचिन बलाढे, शहबाज कुरेशी, अकील कुरेशी, फारूक शेख, आदम औटी, अतिक शेख, पापा शेख इत्यादी उपस्थित होते.