तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील तहसिल कार्यालयात  कामात अडथळा निर्माण करणाऱ्यावर बारा जणांविरोधात तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतीत अधिक माहीती अशी की,  गणेश प्रभाकर पाटील व सोबत 12 महिला व पुरुष यांनी मंगळवार दि. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11,25 वाजण्याचा सुमारास येथील तहसील कार्यालयात तहसिलदार अरविंद शंकरराव बोळगे हे त्यांचे कार्यालयात शासकिय काम पार पाडत असताना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून सोबत प्लॅस्टीक बाटली मध्ये ज्वलनशील द्रव्य स्वरुपाचा पदार्थ, आगपेटी घेवून बेकायदेशीरपणे फिर्यादीचे दालनात प्रवेश करुन स्वत:स आगपेटीचे साह्याने पेटवुन घेण्याचा प्रयत्न करुन दुसऱ्याचे जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करुन शासकीय अधिकारी यांचेवरती दबाव निर्माण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. जिल्हाधिकारी धाराशिव यांचे बंदीआदेशाचे उल्लंघन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी तहसिलदार अरविंद  बोळगे यांनी दि.26 फेब्रुवारी रोजी  दिली. त्यावरून तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 189(2),190, 125, 221, 312 सह कलम 37(1),(3) महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 
Top