धाराशिव (प्रतिनिधी)- येथील ॲडवोकेट श्रीनाथ कोळी यांच्या लीगल अडवायझर ऑफिस चे उद्घाटन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख , डॉ.बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कायला कृष्ण मूर्ती आणि श्रीनाथ कोळी यांचे आई वडील श्री भाऊसाहेब कोळी आणि सौ शारदा कोळी यांच्या शुभहस्ते शिवजयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी वरील उद्गार काढले.
प्राचार्य डॉ. देशमुख पुढे म्हणाले की,समाजातील ज्या दिनदुबळ्या गरजू आणि गरीब लोकांना कायदेशीर सल्ल्याची गरज आहे अशा लोकांना योग्य तो सल्ला द्यावा.आणि त्यांना मदत करावी. त्याचबरोबर समाजामध्ये निर्माण झालेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक करून गरीब व्यक्तींना दाद मिळवून द्यावी. या पेशाकडे आपण उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता समाज हिताचे कार्य करावे तेव्हाच बापूजी चे स्वप्न पूर्ण होईल असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी प्राचार्य डॉ. कायला कृष्णमूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, भविष्यामध्ये आपणाला कायदेशीर सल्ल्याची गरज असल्यास महाविद्यालय आपणाला नक्कीच मदत करेल. आपण नेहमी समाज उपयोगी कार्य करत राहावे.यावेळी त्यांनी त्यांच्या भविष्य काळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ॲड श्रीनाथ कोळी यांचे वडील श्री भाऊसाहेब कोळी ,आई सौ शारदा कोळी , पत्नी सौ मीरा कोळी मोठा भाऊ सागर कोळी , वहीणी सौ सीमा कोळी, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील प्रा.डॉ.संदीप देशमुख ,प्रा. डॉ.मारुती लोंढे त्याचबरोबर प्रा.सूर्यकांत जोगदंड प्रा.अभिमन्यू गायकवाड, प्रा.बालाजी आगळे प्रा. सुनील मोहिते, प्रा. सुनील वाकडे, प्रा. रवी पवळे आदीसह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.