धाराशिव (प्रतिनिधी)- स्व. पवनराजे निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त पवनराजे कॉम्प्लेक्स येथील खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या कार्यालातील सभागृहात 2025 च्या स्व. पवनराजे स्मृती गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यंदा सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जनहित परिवार येरमाळाचे संस्थापक प्रा. संतोष तौर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रताप देशमुख, रोहन देशमुख, जयश्री भुसारे, नानाराव भोसले, प्रवीण काकडे आणि चंद्रसेन देशमुख यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्कार वितरणाच्या वेळी लोकमंगल मल्टीस्टेटचे व्हा. चेअरमन बालाजी शिंदे यांनी रोहन देशमुख यांच्या वतीने तर पत्रकार चंद्रसेन देशमुख यांच्या वतीने आरिफ शेख यांनी पुरस्कार स्वीकारला.


या सोहळ्यास सहकार शिरोमणी ह.भ.प. वसंतराव नागदे महाराज, धाराशिव-कळंबचे आमदार कैलासदादा पाटील, प्रतापभैय्या देशमुख, पांडुरंग कुंभार, पांडुरंग शिंदे आणि पुरस्कार समितीचे समन्वयक कै. पवनराजे साहेबांचे जिवलग असणारे गणेशराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रभाकर चोराखळीकर यांनी केले.


 
Top