कळंब -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड कळंब चा वतीने गरजू कामगार बांधवाना अपघाता पासून संरक्षण मिळावे व हेल्मेट वापरावे शिवजयंती निमित्त संदेश देण्यासाठी हेल्मेट वाटप करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष जावेद भाई सौदागर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला.
या वेळी पोलिस निरीक्षक रवी सानप साहेब , संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक अतुल भैया गायकवाड,संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ कवडे,मकसुद भाई शिकलकर,इस्माईल भाई हनुरे,अरविंद गायकवाड सर, शक्ती नलावडे, ईल्यास कुरेशी विलास गुंठाळ, वैभव जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.