परंडा - येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज  यांची जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शहारात विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात करण्यात आली.

   यावेळी प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व्याख्यान दिले.ते आपल्या व्याख्यानात म्हणाले की  शिवाजी महाराज यांनी बहुजन समाजाला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. जाती पातीच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराज यांनी या देशासाठी योग दान दिले या व्याख्यान मध्ये अनेक विविध महाराजांच्या कार्यावार आपल्या व्याख्यानात म्हटले आहे. 

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने कनिष्ठ विभागाचे परिवेक्षक प्रा.किरण देशमुख कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे व वरिष्ठ विभागातील कनिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

 
Top