कळंब -अनेक महापुरुषांना जातीच्या जोखडात अडकवण्याचा प्रयत्न समाजातील काही लोक करतात मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी पावणे चारशे वर्षांपूर्वी वेगवेगळे समाज एकत्र करून खऱ्या अर्थाने सोशल इंजिनिअरिंग केले होते व सर्व समाज सोबत घेऊन चालण्याचे कसंब त्यांनी त्या काळात साधले होते.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सहकाऱ्याकडे  जे कौशल्य आहे त्याला त्या पद्धतीचे काम देऊन स्वराज्याची निर्मिती केली असे प्रतिपादन शिवव्याख्याते,उद्योजक व उपक्रमशील शिक्षक महादेव खराटे यांनी स्वप्ननगरी येथील शिवजन्मोत्सव कार्यक्रमात बोलताना केले.यावेळी व्यासपीठावर डॉ.रामकृष्ण लोंढे,ॲड.प्रताप सोनटक्के 

डॉ.रमेश जाधवर,स्वप्ननगरी सोसायटीचे अध्यक्ष दिलीप टोणगे,शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष परमेश्वर पालकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.


 पुढे बोलताना महादेव खराटे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणताही काळ शुभ-अशुभ न मानता जवळपास सर्व लढाया अमावस्येच्या रात्री करून जिंकल्या मात्र आपण आजही अमावस्याला गाडीला लिंबू आणि मिरची बांधतो ही अंधश्रद्धा नष्ट झाल्या पाहिजेत.साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधलेला सिंधुदुर्गचा किल्ला आज देखील समुद्रात इतक्या लाटा  येत असताना तो आजही तसाच आहे हे काम फक्त छत्रपती करू शकतात. महाराजांनी सर्व जाती धर्माला सामावून घेत स्वराज्य निर्मिती करताना एक एक सहकारी  शोधून काढला होता आणि त्याचा नंतर योग्य ठिकाणी उपयोग देखील केला आणि स्वराज्य निर्मिती केली.छत्रपतींकडून नियोजन,कृती, समय सूचकता असे अनेक गुण घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो असे देखील त्यांनी बोलताना सांगितले.

 यावेळी डॉ.रामकृष्ण लोंढे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.तानाजी चौधरी सूत्रसंचलन हरिभाऊ मोरे व अमोल पवार यांनी तर आभार प्रा.सतिश मातने यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्ननगरी सोसायटीतील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


 
Top