तुळजापूर (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवार सकाळी श्री. तुळजाभवानी देवींची सहकुटुंब अभिषेक महापूजा करुन मनोभावे दर्शन घेतले. 

पालकमंञी  प्रताप सरनाईक हे सध्या दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर आहेत. अभिषेक महापूजेनंतर त्यांनी सध्या चालू असलेल्या विकास आराखड्याच्या कामांची पाहणी केली. विकास आराखड्याच्या कामासंदर्भात पालकमंत्र्यांनी पुजाऱ्यांशी चर्चा करून त्याबाबत त्यांची मते जाणून घेतली. यावेळी पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

 
Top