तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून सत्तावीस वर्षिय तरुणाने दोन वर्ष चिमुकल्या व कुंटुबासह आत्महत्या करणार असल्याचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले.

सदरील निवेदन अभिषेक सुदर्शन इंगळे यांनी दि.10 फेब्रुवारी रोजी दिले आहे. निवेदनात असे नमूद केले आहे की, तुळजापूर शहरातील रहिवाशी असलेले अभिषेक सुदर्शन इंगळे व पत्नी अंकिता अभिषेक इंगळे व मुलगा अर्णव अभिषेक इंगळे व माझ्या कुटूंबाला या अवैध सावकारापासुन जिवाला धोका निर्माण झाला आहे. या त्रासाला कंटाळून सामूहिक इंगळे कुटुंब आत्महत्या करीत आहे.  तरी अवैध सावकारी व फायनान्सच्या पाशात असंख्य सुशिक्षित बेरोजगार, छोटे-मोठे व्यावसायिक अडकले आहेत. त्यांना या सावकरी पाशातुन मुक्त करण्याची मागणी होत आहे.

 
Top