धाराशिव/ तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या नगरीतील ड्रग्ज माफीयां किती मोठा असुद्या त्याची गय न करता पकडा व जेल टाका असा इशारा पालकमंञी प्रताप सरनाईक यांनी गुरुवार दि. 20 फेब्रुवारी रोजी श्रीतुळजाभवानी दर्शनानंतर बैठकीत दिला.
यावेळी बोलताना पुढे म्हणाले, पविञ धार्मिक स्थळांनामध्ये अमली पदार्थ विकले जाणे हे निंदणीय आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची मुख्यमंत्री, दोन उपमुखमंञी यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे 72 तासात मोकाट ड्रग्ज तस्करांना पकडा अन्यथा स्थानिक पोलिसांवर कारवाई करावी लागेल. ड्रग्ज तस्करी मध्ये कितीही मोठे राजकिय मंडळी अथवा पोलिस अधिकारी आला तर त्याला सोडणार नाही, जेलमध्ये टाकणार. तिर्थक्षेञ तुळजापूर ड्रग्स व अवैध धंदे मुक्त करणार असा इशारा पालकमंञी प्रताप सरनाईक यांनी दिला.
जिल्हा ड्रग्ज मुक्त करणे माझी जबाबदारी आहे. तसे एसपी ना आताच बैठकीत मी सुचना केली आहे. बहात्तर तासात मोकाट ड्रग्ज तस्करांना पकडा अन्यथा तेथील पोलिस अधिका-यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले. यावेळी तक्रारदारांना कारवाई धमकी बाबतीत बोलताना सरनाईक म्हणाले कि, आदी ड्रग्ज तस्कर पकडा त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा मला तुमच्या विरोधात तक्रार द्यावी लागेल असा इशारा दिला.
पुजाऱ्यांना धमकी नको
यावेळी बैठकीत तक्रार करणाऱ्या एका पुजाऱ्यास तुळजापूर येथील पोलिस अधिकाऱ्याने तुम्हाला नोटीस द्यावी लागेल अशा प्रकाराची धमकी दिली. यानंतर सदर पुजाऱ्याने पालकमंत्री यांना या सदर्भात सांगितले. पालकमंत्री यांनी रस्त्यावर पोलिस अधिकाऱ्यांना पुजाऱ्यांना धमकी देता का? असे म्हणत पोलिस अधिकाऱ्यास धारेवर धरले.